Background
Introductory Memo
जोशुआ प्रोजेक्ट अंतर्गत भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठिकाणी हे Soul Harvesting नावाने खुलेआम चालते, तर काही ठिकाणी सामाजिक सेवा, शिक्षण, आणि आरोग्यसेवेच्या नावाखाली गुप्तपणे हा प्रकार घडतो. विशेषतः गरीब आणि वंचित घटकांना लक्ष्य करून, आर्थिक मदत आणि उपचाराच्या माध्यमातून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
याच दरम्यान Soul Harvesting या धोरणाचा एक धक्कादायक नमुना पुण्यातील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथून समोर आला आहे. शासकीय रुग्णालयाच्या आतच धर्मांतराच्या घटना घडत असल्याने हा प्रकार किती खोलवर रुजला आहे, याचा अंदाज येतो. त्यामुळेच कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल ख्रिश्चन मिशनरींचा अड्डा बनले आहे का? पुणे ख्रिश्चन धर्मप्रसाराचे माहेरघर झाले आहे का? या रुग्णालयाला धर्मांतरासाठी पाठबळ मिळते का? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
- 14 booked for forcing Hindus to convert to Christianity, earlier 3 were charged for offering red grape juice as the ‘blood of Jesus Christ’
- पुणे हे ख्रिश्चनांचे माहेर घर ?
- देश के 4 राज्यों में चल रहा मिशन जोशुआ:लोगों को ईसाई बनाया जा रहा; वेबसाइट का दावा- 100 में से 4 लोग धर्म बदल रहे
- US-based Christian pastor claims over 1 lakh Hindus converted just in a week, says RSS and PM Modi made conversions tough in north India
पण या सर्व आधी Soul Harvesting म्हणजे काय हे जाणून घेऊयात?
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, "सोल हार्वेस्टिंग" म्हणजे एखाद्या व्यक्तीला तिच्या मूळ धर्म आणि विचारांपासून पूर्णपणे तोडून तिचे धर्मांतरण करणे. यामध्ये प्रामुख्याने मानसिक, सामाजिक आणि भावनिक दबाव टाकला जातो. गरीब, मागास, तसेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींचा अभाव असलेल्या लोकांना लक्ष्य केले जाते आणि त्यांना मदतीच्या नावाखाली त्यांच्या मूळ संस्कृतीपासून दूर केले जाते.
माहिती साठी इस्लामप्रमाणे येथे बळजबरी केली जात नाही, तर सोल हार्वेस्टिंगमध्ये लोकांच्या भावनांशी खेळले जाते आणि हळूहळू त्यांचे धर्मांतर घडवले जाते.
यामध्ये भावनिक, सामाजिक आणि मानसिक प्रभावाचा वापर करून व्यक्तीला तिच्या मूळ धर्म आणि संस्कृतीपासून तोडले जाते. प्रथम त्यांना सहानुभूती आणि मदतीच्या नावाखाली जवळ केले जाते, आणि नंतर त्यांच्या विचारांमध्ये हळूहळू बदल घडवला जातो. स्वर्ग, मोक्ष, चांगले आयुष्य, दैवी कृपा यासारखी प्रलोभने दाखवून त्यांच्या मानसिकतेवर नियंत्रण मिळवले जाते.
ही एक योजनाबद्ध प्रक्रिया आहे, जिथे सहजपणे आणि हळूहळू मानसिक परिवर्तन घडवून धर्मांतरण केले जाते, ज्यामुळे संबंधित व्यक्तीला हे कधीच सक्ती वाटत नाही.
सोल हार्वेस्टिंग हा केवळ धार्मिक धर्मांतरणाचा विषय नाही, तर तो एक मोठा उद्योग आणि आर्थिक फायदा मिळवण्याचा मार्ग देखील आहे. ज्या व्यक्तीने जितके जास्त लोकांचे धर्मांतर केले, त्याला तितके जास्त fund मिळतात. आणि साठी परदेशी संस्था आणि संघटना मोठ्या प्रमाणावर अनुदान (फंडिंग) देतात, जेणेकरून धर्मांतराची गती वाढेल.
याच Soul Harvesting concept च्या अंतर्गत पुणे शहरातील कॅम्प मधील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मध्ये धर्मांतराचा प्रकार चालू होता. मेघा जगताप ही महिला पास्टर व crypto christian हॉस्पिटल मधील हिंदू रुग्णांना “बायबल” चे धडे देत होती. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या असहाय्य आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना लक्ष्य करून, त्यांचे धार्मिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात होता. "येशूचे नाव घेतल्यास तुमच्या वेदना कमी होतील, तुम्ही बरे व्हाल" असे सांगून रुग्णांना मानसिकदृष्ट्या प्रभावित केले जात होते.
जेव्हा त्या महिलेची काही जागरूक हिंदू नागरिकांकडून चौकशी करण्यात आली, तेव्हा पास्टर महिलेच्या बॅग मध्ये लाल पाण्याच्या बाटल्या, पैशांची पाकिटे आढळून आले. अजून माहिती काढल्या असे पुढे आले कि हा प्रकार बरेच दिवस झाले कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मध्ये सुरू आहे. परंतु रुग्णालयाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने या विषयी कुठल्या ही प्रकारची कारवाई केली नाही.. म्हणजेच याचा सरळ अर्थ असाही निघतो कि मेघ वरती कुठल्यातरी अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे.
मुख्य म्हणजे जेव्हा हा प्रकार समोर आला, तेव्हा हा विषय दाबून टाकण्यात आला. सुदैवाने या गोष्टीचा VIDEO मात्र SOCIAL MEDIA वरती VIRAL झाला आणि या घटनेला वाचा फुटली आणि कश्या प्रकारे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल ख्रिश्चन मिशनरींचा अड्डा झाला आहे हे उघडकीस आले आहे.
गेल्या वर्षी अशीच एक घटना आळंदीतही घडली होती. आणि मुळात भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे असे नाही, तर अशा घटना वारंवार समोर येत आहेत. असं मध्ये सुद्धा अश्याच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले. आसाम मध्ये सुद्धा रुग्णांना बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर सुरु होते.
समाजसेवेच्या आणि गरजू रुग्णांच्या मदतीच्या नावाखाली धर्मांतरण करण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. हीच "मोडस ऑपेरेंडी" (modus operandi) आहे, जी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गांनी राबवली जाते. मदर तेरेसा या कार्यासाठी विख्यात होत्या. विशेष म्हणजे, हीच कार्यपद्धती वापरणाऱ्या महिलेचा गौरव काँग्रेस सरकारने "भारत रत्न" देऊन केला आहे. समाजसेवेच्या या आवरणाखाली त्यांचा खरा चेहरा होता तो धर्मांतरासाठी हपापलेल्या व्यक्तीचा.ख्रिस्तोफर हिचेन्स तर तेरेसा यांचे वर्णन 'फॅनेटिक, फंडामेंटालिस्ट अँड फ्रॉड' असेच करतात.
तेरेसा यांनी अनेक वैद्यकीय केंद्रे स्थापन केल्याचा दाखला दिला जातो.परंतु त्या वैद्यकीय संस्थांमध्ये वैद्यकीय व्यवस्था परिपूर्ण केल्या नाहीत, कारण लोकांना वेदनांमध्ये बघण्याची वृत्ती त्यांचे ठायी होती . अशा वेदनांमुळे चेहऱ्यावरून आपण मायेचा हात कसा फिरवतो हे दाखवण्यात मदर तेरेसा आनंद मानत.
परंतु, हा पैलू कधीच बाकी जगा समोर उलगडू दिला नाही. जेव्हा मदर तेरेसा यांचा हा चेहरा गिरीश कुबेर यांनी त्यांच्या लेखातून पुढे आणला तेव्हा त्यांना जगासमोर माफी मागावी लागली. या वरूनच या गोष्टीचे गांभीर्य कळून येते. पण या मागे कुठली संस्था आहे ?

जोशुआ प्रोजेक्टच्या माध्यमातून भारतभर मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती धर्मांतर सुरू आहे, आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व कायदेशीर चौकटीत राहून होत आहे. या धर्मांतराचे प्रमाण किती भयंकर आहे, याचा अंदाज एका व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून येतो, जिथे एक फादर उघडपणे, कोणतीही लपवाछपवी न करता, अवघ्या आठवड्यात १ लाख लोकांचे धर्मांतर केल्याचा अभिमानाने उल्लेख करतो.


या प्रक्रियेचे भयावह वास्तव असे आहे की, जो कोणी याविरोधात आवाज उठवतो, त्याला गिरीश कुबेर यांच्यासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. जगात कधीही एखाद्या संपादकाने आपला संपादकीय लेख मागे घेतल्याचा प्रसंग क्वचितच घडला असेल, पण कुबेर यांना तसे करावे लागले. यावरून या शक्तींच्या प्रभावाची कल्पना येते. जर वेळीच हे धर्मांतर थांबवले नाही, तर हे भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूलभूत रचनेला पोखरून टाकेल, हे निश्चित!

Pune.. Christian Changai festival . Now Mahrashtra is open for christian missionaries ... pic.twitter.com/efiaWr8fqz
— No Conversion (@noconversion) May 10, 2020
Assam: Hindu youth lynched by Christian mob for refusing to convert to Christianity to marry girlfriend pic.twitter.com/2rvnoAIw5W
— PlanH (@planH_In) September 15, 2022
Mass Hindu to Christian conversion in Assam area .. details are in video (vid3) #noconversion pic.twitter.com/QH0dg9Ozuy
— No Conversion (@noconversion) July 11, 2022
Mass Hindu to Christian conversion in Assam area .. details are in video (vid3) #noconversion pic.twitter.com/QH0dg9Ozuy
— No Conversion (@noconversion) July 11, 2022