Background
जम्मू-काश्मीर, विशेषतः अनंतनाग जिल्हा, हे प्राचीन काळापासून हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. तेथे सापडलेल्या शिवलिंगांमुळे या प्रदेशातील समृद्ध हिंदू इतिहासावर नव्याने प्रकाश पडला. या प्रदेशाला लाभलेल्या कर्तुत्ववान राज्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची देखील या निमित्ताने पुनरावृत्ती होईल. अनंतनाग जिल्ह्यात उत्खननादरम्यान नुकत्याच सापडलेल्या विविध देवी देवतांच्या प्राचीन मूर्ती आणि ११ शिवलिंगे हे अलौकिक हिंदू वारशाचे प्रतीक आहे. जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील ‘ऐशमुकाम’ परिसरातील ‘सालिया’ गावातील 'करकूट नाग' नावाच्या एका पुरातन झऱ्याच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी सुरु उत्खननादरम्यान अनेक पुरातन मूर्ती सापडल्या. उत्खननामध्ये सापडलेल्या एकूण १५ मूर्तींमध्ये ११ शिवलिंगांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, देवी-देवतांच्या मूर्ती आणि काही धार्मिक चिन्हेही आढळली आहेत. पुरातत्व विभागाच्या मते, या मूर्तींचा संबंध सन ६२५ ते ८५५ या काळात काश्मीरवर राज्य करणाऱ्या 'कर्कोटक राजवंशाशी असू शकतो. कर्कोटक राजघराणे सनातन धर्माचे अनुयायी होते. त्याचा काश्मीरसह भारतीय उपखंडाच्या उत्तर भागावर मोठा प्रभाव होता. ह्यू एन त्संगच्या प्रवासवर्णनात लिहिले आहे की ओरसा (हाजरा), काम्बोज प्रदेश - राजधानी कपिशा (काबुल), तक्षशिला, सिंहपुरा, राजौरी, पुंछ ही राज्ये कर्कोटक साम्राज्याची मांडलिक होती.
काश्मीरचा किमान ढोबळ स्वरूपातील का होईना सलग पाच हजार वर्षांचा इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. हिमालय पर्वताने घेरल्यामुळे काश्मिरी भाषा व तेथील संस्कृती अत्यंत वेगळ्या पद्धतीने विकसित झालेली आहे. सर्व धर्मांचे आणि ज्ञानाचे केंद्र म्हणून काश्मीरने सातवे ते तेरावे शतक अशी जवळपास सातशे वर्षे भारताचे नेतृत्व केलेले आहे. येथे मिळालेल्या या ऐतीहासिक मुर्ती तेथील हिंदू धर्माचा प्रभाव दर्शवतात. सापडलेल्या एकूण १५ मूर्तींमध्ये ११ शिवलिंगाचा समावेश आहे. या मूर्तीचा संबंध ६२५ ते ८५५ या काळात काश्मीरवर राज्य करणाऱ्या कर्कोटक राजवंशाशी जोडला जात आहे. या परिसराचे काश्मिरी पंडीतासाठी विशेष महत्व आहे.
शोधाचे विशेष महत्व:
१. सांस्कृतिक आणि धार्मिक सातत्य: काश्मीरमध्ये हजारो वर्षांपासून हिंदू धर्म खोलवर रुजलेला आहे, हे या शोधातून सिद्ध होते. काश्मीरला 'शारदा पीठ' किंवा 'शारदा देश' म्हणूनही ओळखले जाते. हा प्रदेश प्राचीन काळापासून हिंदू धर्म आणि ज्ञानाचे केंद्र राहिलेला आहे. या मूर्ती काश्मीरमधील प्राचीन धार्मिक वारसा आहेत.
२. शैव परंपरेचे केंद्र: सापडलेल्या ११ शिवलिंगांवरून हे स्पष्ट होते की, काश्मीरमधील अनंतनाग या ठिकाणी शैव परंपरा अत्यंत प्रभावी होती. भगवान शिव हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत आणि शिवलिंग हे त्यांची उपासना करण्याचे प्रमुख प्रतीक आहे. काश्मीर हे शैव दर्शनाचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथील अमरनाथ यात्रा ही शैव परंपरेचे एक जिवंत उदाहरण आहे. अमरनाथ यात्रा ही केवळ एक तीर्थयात्रा नसून, तो भक्ती, त्याग आणि आत्म-शोधाचा एक अद्भुत प्रवास आहे. लाखो भाविक दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने या यात्रेत सहभागी होतात.
३. पौराणिक कथा आणि श्रद्धांशी संबंध: 'करकूट नाग' नावाच्या झऱ्याजवळ या मूर्ती सापडल्या आहेत. करकूट या शब्दाची उत्पत्ती कर्कोटक या संस्कृत शब्दाशी आहे. अनंतनागमध्ये करकूट नाग आणि पापहरण नाग यांची मंदिरे आहेत. पापहरण नाग करकूट नाग ट्रस्ट या या मंदिरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ट्रस्टनुसार, ही मंदिरे महाभारतकालीन आहेत. नाग आणि जलदेवतांचा परस्परसंबंध दर्शवणाऱ्या अनेक प्राचीन कथांही प्रचलित आहेत. या शोधामुळे त्या श्रद्धांना अधिक बळकटी मिळते. सनातन धर्मात निसर्ग आणि जलस्रोतांची पूजा करण्याची परंपरा आहे. नाग (झरे) देवतेची पूजा काश्मीरमधील प्राचीन परंपरेचा एक भाग आहे आणि या प्रदेशातील अनेक झऱ्यांना धार्मिक महत्त्व आहे.
४. काश्मिरी पंडितांसाठी आशेचा किरण: ऐतिहासिक काळात काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांसाठी हा शोध विशेष महत्त्वाचा आहे. या मूर्ती त्यांच्या मूळ भूमीतील धार्मिक वारशाची आठवण करून देतात. हा शोध त्यांच्यासाठी आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी पुन्हा जोडले जाण्याचा पुरावा देतो.
कर्कोटक राजवंश
कर्कोटक राजवंश हा काश्मीरच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो, कारण या काळात कला, संस्कृती आणि स्थापत्यकलेचा विकास झाला. हा राजवंश काश्मीरच्या इतिहासातील एक महत्त्वाचा राजवंश होता. या राजवंशाने सातव्या ते नवव्या शतकादरम्यान राज्य केले. कल्हणच्या 'राजतरंगिणी' या ग्रंथातून या वंशाची माहिती मिळते. राजा दुर्लभवर्धन यांनी कर्कोटक राजवंशाची स्थापना केली आणि त्यांच्या वंशजांनी काश्मीरचा विस्तार केला. या वंशातील सर्वात पराक्रमी राजा ललितादित्य मुक्तपीड हे होते. त्यांच्या काळात काश्मीरच्या साम्राज्याने मोठी प्रगती केली. त्यांनी पंजाब, कन्नौज आणि मध्य आशियातील अनेक प्रदेश जिंकून आपल्या राज्याच्या सीमा वाढवल्या. ललितादित्य राजाच्या काळातच प्रसिद्ध मार्तंड सूर्य मंदिर बांधले गेले. या मंदिराची भव्यता आजही त्याच्या स्थापत्यकलेची साक्ष देते. ललितादित्यां च्या मृत्यूनंतर राजवंशाची सत्ता हळूहळू कमी होत गेली आणि नंतर उत्पल वंशाने त्यांची जागा घेतली.
राजा ललितादित्य मुक्तपीड हे काश्मीरच्या कर्कोटक राजवंशातील एक पराक्रमी सम्राट होते. त्यांच्या राजवटीत (सुमारे ७२४ ते ७६० इ.स.) काश्मीर राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. त्यांना भारताच्या इतिहासातील एक महान दिग्विजयी सम्राट मानले जाते. राजा ललितादित्य मुक्तापीड यांच्या नेतृत्वाखाली या साम्राज्याचा मोठा विस्तार झाला. त्यांनी मध्य आशियातील आणि तिबेटमधून होणाऱ्या आक्रमणांचा यशस्वीपणे प्रतिकार करून आपल्या राज्याचे संरक्षण केले.
कर्कोटक राजांच्या काळात स्थापत्यशास्त्र आणि राजा ललितादित्यांचा राज्यविस्तार:
भारताला संपूर्णपणे इस्लामी देश बनवणे हे उमय्यद खलिफा हज्जाज बिन युसूफ याचे ध्येय होते. त्याने त्याचा पुतण्या मुहम्मद बिन कासीमला भारतावर स्वारी करण्यास पाठवले. मुहम्मद बिन कासीमने सन ७१२ मध्ये सिंधवर हल्ला केला. तेथील राजा दाहिरचा विश्वासघातामुळे पराभव झाला. मुहम्मद बिन कासीमच्या या मोहिमेबाबत लिहिलेल्या चचनामा किंवा फतेहनामा सिंध (अरबीमध्ये तारिख अल-हिंद वा अस-सिंध) या पुस्तकामध्ये सिंधचा राजा दाहिरने लिहिलेल्या एका पत्रात राजा ललितादित्यचा उल्लेख पुढीलप्रमाणे आहे:-
"ज्याच्या राज्याच्या उंबरठ्यावर हिंदच्या इतर राज्यकर्त्यांनी आपले डोके ठेवले होते, जो संपूर्ण हिंद, अगदी मकरन आणि तुरान देशांवरही राज्य करतो, ज्याच्या साखळ्या अनेक श्रेष्ठी आणि थोरांनी स्वेच्छेने गुडघ्यावर ठेवल्या आहेत असा काश्मीरचा राजा जर मी तुमच्याविरुद्ध पाठवला असता..."
सिंध जिंकल्यावर उमय्यद खलिफाने मुहम्मद बिन कासीमला दमास्कसला पाठवले आणि जुनैद याची सिंधमध्ये नियुक्ती केली. खलिफाच्या आदेशाने जुनैदने काश्मीरवर आक्रमण केले. पण ललितादित्य यांनी चीनच्या टॅन्ग राजघराण्यासोबत समझोता करून आक्रमकांना तर हरवलेच पण तत्कालीन बांगलादेश आणि अन्य काही जागांवर आपले नियंत्रणही मिळवले. त्यांनी त्यावेळी उझबेकिस्तान, तजिकिस्तान, दक्षिण किर्गिझस्तान आणि दक्षिण कझाकिस्तानवरही विजय मिळवला होता. त्यांनतर काबूलमार्गे त्यांनी तुर्कीस्तानवर हल्ला करून मोमीन बुकाराचा पराभव केला. अल बेरुनी देखील त्याच्या ‘तारीख ए हिन्द’ मध्ये लिहितो, “ बुखाराचा राज्यपाल मोमीन याचा काश्मिरी राजा मुथाईने पराभव केला.” अशा प्रकारे ललितादित्यच्या राज्याची सीमा कॅस्पियन समुद्र, तसेच काराकोरम पर्वत शृंखलापर्यंत विस्तारली.
राजा ललितादित्य मुक्तपीड यांच्या कार्याची दखल आजही त्यांच्या स्थापत्यशास्त्र, पाणी व्यवस्थापन, राजकीय नेतृत्व या योगदानामुळे घेतली जाते. त्यांचे कार्य केवळ इतिहासाचा भाग नसून, अनेक क्षेत्रांसाठी एक प्रेरणास्रोत आणि अभ्यासाचा विषय आहे. कर्कोटक राजघराणे (इ.स. ६२५ - ८५५) हे काश्मीरच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. या घराण्याने काश्मीरला केवळ राजकीय स्थैर्य मिळाले नाही, तर कलांना मोठा राजाश्रय मिळाला. कर्कोटक राजघराण्याने काश्मीरच्या लष्करी, सांस्कृतिक आणि प्रशासकीय विकासासाठी मोठे योगदान दिले.
भारताच्या उत्तरेतील सीमाभागावर चीन आणि पाकिस्तानने कायम खोटे दावे केले आहेत. विस्तारवादी चीन अनेकदा असे खोटे दावे करतो की भारताच्या काही भागांवर त्यांचा ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक प्रभाव राहिला आहे. लडाखमधील अक्साई चिन हे चीनसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र आहे. असे सांस्कृतिक दावे करून चीनने तिबेटला गिळंकृत केलेच आहे. मात्र, भारतीय कर्कोटक राजवंशाचे ऐतिहासिक प्रभावक्षेत्र पाहता आणि त्यांच्या माध्यमातून या भागांत झालेली भरभराट समजून घेता, आज देखील या सर्व क्षेत्रात भारताचे सांस्कृतिक वर्चस्व टिकून आहे. अनंतनाग येथे मिळालेल्या या मूर्ती तसेच शिवलिंग हे कश्मीर तसेच इतर प्रदेशाचे भारताबरोबरचे ऐतिहासिक संबंध अधिक स्पष्ट करतात आणि चीनसारख्या विस्तारवादी देशांचे खोटे दावे देऊन इतर देशांचा भूभाग गिळंकृत करण्याच्या वृत्तीला आव्हान देतात.
कश्मीरवर राज्य केलेल्या या कर्कोटक राजवंशाचे व अनंतनाग सारख्या पवित्र स्थळाच्या वारसाचे प्रतिक म्हणजे उत्खानानांत सापडलेल्या या मूर्ती व शिवलिंग. जम्मू काश्मीरच्या अभिलेखागार, पुरातत्व आणि संग्रहालय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि मूर्तींचे वय आणि मूळ निश्चित करण्यासाठी साहित्य आणि तारीख चाचणीसाठी या मूर्ती श्रीनगर येथे पाठवण्यात आल्या आहेत. या चाचणी नंतर मूर्तीबद्दल अधिक स्पष्टता येईल.
Ancient Hindu Idols Found in Kashmir. 📍J&K: Ancient Hindu idols including 11 Shivlings have been UNEARTHED by local labourers during the renovation of a spring at Karkoot Nag in the Salia area of Aishmuqam, Anantnag. Ancient Hindu idols including 11 Shivlings have been unearthed by local labourers during the renovation and digging work of a holy spring at Karkoot Nag in the Salia area of Anantnag ,Kashmir.
Introductory Memo
२. मध्य आशियापर्यंत विस्तार: त्यांनी पश्चिमेकडे मोठे अभियान चालवले. त्यांच्या सैन्याने अफगाणिस्तान, तुर्किस्तान आणि मध्य आशियातील अनेक प्रदेश जिंकले. त्यांनी तुर्क, कंबोज, आणि तिबेटी सैन्यांचाही पराभव केला.
३. पूर्वेकडील राज्य: कन्नौजच्या विजयानंतर त्यांनी पूर्वेकडे लक्ष दिले. त्यांनी बिहार आणि बंगालचा काही भाग जिंकला. त्यांच्या साम्राज्याच्या सीमा बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचल्या होत्या.
४. दक्षिणेकडील मोहीम: ललितादित्य यांनी दक्षिण भारतावरही आक्रमण केले. त्यांचे सैन्य दक्षिणेकडील कोंकण किनारपट्टीपर्यंत पोहोचले होते, असे काही ऐतिहासिक नोंदी सांगतात.
५. उत्तरेकडील व ईशान्येकडील विजय: उत्तरेकडील तिबेट आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांवरही त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या राज्याच्या सीमा काराकोरम पर्वतरांगांच्या पलीकडे चीनपर्यंत पोहोचल्या होत्या.
अशा प्रकारे, राजा ललितादित्य मुक्तपीड यांचे साम्राज्य पूर्व बंगालपासून ते पश्चिम तुर्किस्तानपर्यंत आणि उत्तर तिबेटपासून ते दक्षिण भारताच्या काही भागांपर्यंत पसरले होते. त्यांच्या या पराक्रमामुळे त्यांना "काश्मीरचा अलेक्झांडर" असेही म्हटले जाते.
Local labourers have unearthed ancient Hindu idols, including 11 Shivlings, during the renovation of a spring at Karkoot Nag in the Salia area of Anantnag district’s Aishmuqam in South Kashmir. The discovery was made during clearing a… pic.twitter.com/Jco7s72w7h
— Sanatan hi Satya hai 🚩 pic.twitter.com/7yg2Ny3KX6
No one can deny the #Sanatani Past of Kashmir. #SanatanaDharma #sanatansanskriti pic.twitter.com/jlx78QHgRU