Background
डफली वाजवत भारतविरोधी घोषणा देताना आणि गाणी म्हणतानाचा एका तरुणीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर ती तरुणी प्रख्यात वकील आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतातून हद्दपार करण्याच्या प्रयत्नांना खीळ घालणाऱ्या डाव्या परिसंस्थेशी जवळीक असलेल्या प्रशांत भूषण यांच्या ‘संभावना इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड पॉलिटिक्स' संस्थेशी संबंधित असल्याचे आरोप सुरु झाले. अराजकवादी शक्तींशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे आधीपासूनच वादग्रस्त असलेली संभावना इन्स्टिट्यूट पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. भारतातील अराजकवादी संस्था संघटना आणि सत्तालोलुपतेपोटी त्यांना पाठबळ देणारे राजकीय पक्ष यांचे संवैधानिक संस्था आणि यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसचे अतिवरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर भारताच्या निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला लक्ष्य करताना लोकशाहीचे रक्षण करणे हे माझे काम नाही असे सांगत जेनझीला रस्त्यावर आंदोलन करण्याची चिथावणी दिली होती. या पार्श्वभूमीवर अराजकवादी संस्था आणि संघटनांच्या देशविघातक कारवायांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करून कडक कारवाई करणे आवश्यक ठरते. प्रशांत भूषण हे डाव्या परिसंस्थेशी जवळीक असलेले प्रसिद्ध वकील आणि नेते त्यांच्या भूमिका आणि कृत्यांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आहेत. त्यांनी २००४ मध्ये आपल्या आईच्या नावे सुरु केलेल्या कुमुद भूषण एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या अंतर्गत ‘संभावना इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड पॉलिटिक्स' ही संस्था स्थापन केली. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पालमपूरजवळील कांदबारी गावात जमीन आणि चहाचे मळे खरेदी करून तेथे त्यांनी संभावना इन्स्टिट्यूट आणि समविचारी उपक्रम उडान लर्निंग सेंटर (स्कूल) साठी कायमस्वरूपी कार्यालय सुरु केले. ही संस्था सार्वजनिक हितासाठी कार्य करत असल्याचा दावा करते. परंतु सामाजिक अन्याय, पर्यावरण, माध्यमे आणि सार्वजनिक धोरणांवर कार्यशाळा, प्रशिक्षण आणि चर्चासत्रे आयोजित करण्याच्या नावाखाली विदेशी निधीच्या माध्यमातून भारतविरोधी आणि फूटपाड्या क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचे आरोप तिच्यावर वारंवार होतात. संभावना इन्स्टिट्यूटने २०११ मध्ये विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. २०१४ नंतर आयोजित केलेल्या या कार्यशाळांच्या विषयांचा मागोवा घेतला तर ते भारतातील राजकीय पक्षांच्या नियुक्तीच्या अजेंडाचा कार्यक्रम असल्याचे दिसते. या कार्यशाळांमध्ये डाव्या परिसंस्थेशी जवळीक असलेले आणि हिंदुत्वविरोधी अजेंडा चालवणारे रवीश कुमार, आकाश बॅनर्जी, योगेंद्र यादव, हर्ष मंदर, मेधा पाटकर, प्रतीक सिन्हा यांच्यापासून सोनी सोरी, कविता कृष्णन यांच्यासारखे लोक प्रमुख पाहुणा, वक्ता, प्रशिक्षक, आयोजक होते. एवढेच नाही तर त्यातून मोदी सरकार विरोधी प्रचार करण्यासाठी काळजीपूर्वक राजकीय विषय निवडले गेल्याचेही दिसून येते. संस्थेची पार्श्वभूमी आणि क्रियाकलाप संभावना इन्स्टिट्यूटने तथाकथित सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांसाठी कार्य करण्याच्या नावाखाली तरुणांना भडकावून त्यांना यंत्रणेच्या विरोधात उभे राहण्यासाठी तयार करते असे दिसून येते. राजकीय विषय हाती घेऊन लोकांचे संघटन करण्याबद्दल कोणालाच तक्रार असण्याचे काहीच कारण नाही. परंतु एखादी संस्था सामाजिक, पर्यावरणीय विषय हाताळण्याच्या नावाखाली राजकीय अजेन्डा राबवते तेव्हा त्यामागे कोणत्या अराष्ट्रीय शक्ती कार्यरत आहेत काय याचा शोध घेणे अपरिहार्य होते. डावा अराजकवादी विमर्श रेटण्यासाठी संभावना इन्स्टिट्यूट विविध कार्यशाळा आयोजित करते, जसे की: अश्या प्रकारे विविध कार्यशाळांमधून विविध स्तरावरील लोकांच्या सरकारविरोधी आणि जातीय, धार्मिकदृष्ट्या विभाजनवादी मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. बातम्या आणि आरोप: विदेशी निधी आणि प्रचार: संभावना इन्स्टिट्यूट यूएस एड कडून वित्तपुरवठा होणाऱ्या इंटरन्यूज (Internews) या ना नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्थेशी संलग्न आहे. यूएस एडने इंटरन्यूजला ४७२.६ दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला असून, इंटरन्यूज विविध स्वरूपातील ४,२९१ सामाजिक माध्यमांना आर्थिक रसद पोहोचवते. विकिलीक्सच्या ८ फेब्रुवारी २०२५ च्या खुलाश्यानुसार, हा निधी भारतातील राजकीय बदल (रेजिम चेंज) आणि विभागीय प्रचारासाठी वापरला जातो. रवीश कुमार, प्रतीक सिन्हा (ऑल्ट न्यूज), हर्श मंदर, मेधा पाटकर यांच्यासारख्या डाव्या परिसंस्थेतील लोक इंटरन्यूजशी जोडले गेलेले असून, एनआरसी व सीएए कायद्यांना विरोध, नक्षलवादी आणि माओवादी डाव्या संघटनांचे उदात्तीकरण आणि समर्थन, हिंदू विरोधी दृष्टिकोनाचा प्रचार करणे यासाठी त्यांना पैसे मिळतात असा आरोप करण्यात येतो. प्रतीक सिन्हाच्या 'फॅक्टशाला'ने ७५,००० पत्रकारांना भारतविरोधाचे प्रशिक्षण दिले असा आरोप समाजमाध्यमांवर वारंवार केला गेला आहे. फॅक्ट चेकिंगच्या नावाखाली त्यांनी केलेला प्रचार ६.५ कोटी लोकांपर्यंत पोहोचतो. संभावनाच्या संदर्भात, 'द वॉर्निंग साइन: डीप स्टेट' (२०२५) या SSRN पेपरमध्ये संभावना इन्स्टिट्यूटच्या कार्यशाळांना 'भारतविरोधी प्रचार' म्हणून संबोधले आहे आणि संस्थेने २०२४ मध्ये आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांचे विश्लेषण केले आहे. २०१४ मध्ये हिमाचल सरकारने संभावना इन्स्टिट्यूटने जमीन खरेदीसाठी नियमबाह्य परवानगी मिळवल्याचा आरोप करून संस्थेकडील ४.६८ हेक्टर जमीन जप्त केली. संभावना इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड पॉलिटिक्सच्या चर्चा आणि कार्यशाळांशी संबंधित व्यक्ती पाहता, प्रशांत भूषण यांनी संस्थेच्या नावाखाली भारतातील डाव्या विचारसरणीच्या परिसंस्थेतील लोकांचे कोंडाळे जमवले असल्याचे दिसून येते. खाली दिलेल्या काही व्यक्तींच्या नावांवरूनच वाचकांना हे लक्षात येईल. १. योगेंद्र यादव - आम आदमी पक्षाचे संस्थापक पण आम आदमी पक्षामधून हकालपट्टी झाल्यावर, स्वराज अभियानचे सह-संस्थापक प्रशांत भूषण यांच्या सोबत काम सुरु केले २. हर्ष मंदर - सेंटर फॉर इक्विटी स्टडीज, प्रोजेक्ट कारवाँ ए मोहब्बत ३. मेधा पाटकर - पर्यावरणवादी कार्यकर्त्या. नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुव्हमेंटच्या संस्थापक, आम आदमी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक, डाव्या परिसंस्थेतील संस्थांशी सलगीचे संबंध. पर्यावरण संरक्षण, आदिवासींचे हितसंवर्धन इत्यादी मिषांनी सातत्याने विकास प्रकल्पांना विरोध. ४. आकाश बॅनर्जी - युट्यूबर, जुलै २०२४ पासून भक्त बॅनर्जी हे चॅनेल चालवतो. भारतातील लोकशाही यंत्रणेची सातत्याने टिंगल करणे. अमेरिकन दूतावास दिल्ली "इन्फ्लुअन्स टू इम्पॅक्ट" या सोशल मीडिया कार्यशाळेसाठी त्याने आयोजन केले होते. ५. प्रतीक सिन्हा - ऑल्टन्यूजचे सहसंस्थापक. फॅक्ट चेकच्या नावाखाली डाव्या विचारसरणीचा प्रचार. ६. सोनी सोरी - छत्तीसगडमधील नक्षलवादी कार्यकर्त्या, फ्रंटलाइन डिफेंडर संस्थेच्या पुरस्कार विजेत्या. (FLD) ही २००१ मध्ये डब्लिनमध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आहे. FLD ला फोर्ड फाउंडेशन आणि जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनद्वारे निधी दिला जातो. ७. नंदिनी राव - शिक्षण कार्यकर्त्यांच्या कथित भगवेकरणाच्या विरोधात प्रचार. ८. रवीश कुमार - डाव्या परिसंस्थेतील संघटनांशी जवळीक असलेले एनडीटीव्ही हिंदी न्यूज चॅनेलचे माजी संपादक आणि आता युट्युब चॅनेलवरून व्यवस्थाविरोधी प्रचार ९. परंजॉय गुहा ठाकुरता - हिंडनबर्ग अहवालात उल्लेख केला गेलेले एकमेव पत्रकार १०. थॉमस फ्रँको- माजी एसबीआय, माजी ऑल इंडिया बँकर्स फेडरेशन अध्यक्ष, सेंटर फॉर फायनान्शियल अकाउंटेबिलिटी (अदानी अँड अंबानी प्रोजेक्ट वॉचडॉग) चे पूर्णवेळ सल्लागार ११. कविता कृष्णन- कम्युनिस्ट पक्ष ऑफ इंडिया मार्क्सवादी लेनिनच्या पॉलिट ब्युरो सदस्य, चीन समर्थक १२. विजयन एमजे- पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसीच्या इंडिया चॅप्टरचे सरचिटणीस १३. नित्यानंद जयरामन - औद्योगिक प्रकल्प विरोधी कार्यकर्ता १४. बेझवाडा विल्सन- रमन मॅगसेसे पुरस्कार २०१६, अशोका फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो, दलित हक्क कार्यकर्ते १५. आकाश पोयम - द कारवान मासिकाचे सहाय्यक संपादक १६. अत्रेयी मजुमदार- अँड्र्यू डब्ल्यू. मेलॉन फेलो, जॅकमन ह्युमॅनिटीज इन्स्टिट्यूट, टोरंटो विद्यापीठ असोसिएट प्रोफेसर (सोशल सायन्सेस), नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरू १७. मधुरेश कुमार- नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुव्हमेंटसाठी काम करतात १८. विजू कृष्णन- अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे केंद्रीय समिती सदस्य आहेत. कृषी कायदा विरोधी आंदोलनाच्या मुख्य आयोजकांपैकी एक १९. निखिल डे - एमकेएसएस (मजदूर किसान शक्ती संघटना) साठी काम करतात २०. हिमांशू कुमार - मूळचे छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील पण मुक्काम बव्हंशी दिल्लीत. सलवा जुडुम विरोधक. मानवी हक्क संरक्षणाच्या नावाखाली डाव्या दहशतवाद्यांना कायदेशीर मदत २१. प्रशांत भूषण - डाव्या परिसंस्थेशी जवळीक असलेले प्रख्यात वकील आणि नेते. रोहिंग्यांच्या हकालपट्टीला विरोध. उमर खालिदचे वकील. टूलकिट फॅक्ट चेक, प्रसारमाध्यम साक्षरता आणि इतर थीम आधारित कार्यशाळांना मदत करण्यासाठी, प्रोत्साहन व पाठिंबा उपलब्ध करून देण्यासाठी इंटरन्यूज, फॅक्टशाला आणि डेटालीड्स फाऊंडेशन हे संस्थेचे तीन प्रमुख भागीदार सर्व जबाबदारी उचलत असतात. २०२० मध्ये इंटरन्यूजने भारतात डेटालीड्स फाऊंडेशनच्या द्वारे आणि http://Google.org च्या मदतीने फॅक्टशाला सुरू केली. हा डेटालीडसद्वारे गुगल न्यूज इनिशिएटिव्हच्या मदतीने चालवला जाणारा एक बातम्या आणि माहिती साक्षरता कार्यक्रम असल्याचा दावा संस्था करते. फॅक्टशाला लोकांना ऑनलाइन माहितीचे गंभीरपणे मूल्यांकन करण्यास आणि चुकीच्या माहितीतून तथ्ये शोधण्यास मदत करते असा दावा केला जातो. प्रत्यक्षात तेथे दिशाभूल करणारी, चुकीची आणि खोटी माहिती आणि तथ्ये यांची सरमिसळ करून लोकांना भ्रमित करण्याचा हा कारखाना आहे. फॅक्टशाला कार्यक्रम अॅम्बेसेडर प्रोग्राम, द पॉयंटर इन्स्टिट्यूट फॉर मीडिया स्टडीज आणि डिजिटल मीडिया साक्षरता प्रोग्राम मीडियावाईज यांच्या सहकार्याने डेटालीड्सद्वारे गुगल न्यूज इनिशिएटिव्हच्या मदतीने चालवला जातो. पॉयंटर इन्स्टिट्यूट पुढील संस्थांशी संबंधित आहे: व्हिक्टोरिया न्यूलँडच्या मेहुणीद्वारे चालवली जाणारी इन्स्टिट्यूट फॉर वॉर अँड पीस रिपोर्टिंग, जॉन डी. आणि कॅथरीन टी. मॅकआर्थर फाउंडेशन, अमेरिकन सरकारद्वारे अर्थसहाय्यित नॅशनल पब्लिक रेडिओ, द वॉशिंग्टन पोस्ट, डेमोक्रसी फंड आणि पियरे ओमिड्यार यांनी स्थापन केलेला गुगल न्यूज इनिशिएटिव्ह, मेटा, नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रसी ही मिनी सीआयए म्हणून ओळखली जाणारी अमेरिकन सरकारी एजन्सी, मायक्रोसॉफ्ट, ओमिड्यार नेटवर्क / ल्युमिनेट, टिकटॉक आणि व्हॉट्सअॅप. यांच्याकडून पॉयंटर इन्स्टिट्यूटकडे माहिती पोहोचते आणि त्यांनी निर्माण केलेला कन्टेन्ट प्रसारित केला जातो. पॉयंटर इन्स्टिट्यूट फॅक्टशाला सुद्धा कंटेंट निर्मितीसाठी देखील पाठिंबा देते.Introductory Memo