Background
लवकरच ख्रिसमस येईल पाठोपाठ ख्रिस्ती नववर्ष आहेच. प्रेमाचा,आनंदाचा, एकमेकांना भेटवस्तू देण्याचा सण म्हणून ख्रिसमसला हिंदूंसमोर प्रोजेक्ट केले जाईल. केक किती चांगला, शरीरासाठी उत्तम आहे, हे सहिष्णू हिंदूंना सांगितले जाईल. दिवाळीचे गोड पदार्थ म्हणजे डायबिटीज हे आपल्याला सांगितले जाईल. दुःख याचे नाही तर आपण साळसूदपणे हे सगळं कपट कारस्थान सहन करतो. याचेच वैषम्य वाटते. आपली चिरंजीवी संस्कृती पर्यावरण पोषक आहे. परंतु ख्रिस्ती सण हे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करणारी आहे. कुठले तरी झाड उपटून घरात सजवायचे कार्यक्रमांनंतर फेकून द्यायचे आणि आमच्या वडाच्या पूजेला अंधश्रद्धा म्हणायचे, ही कपटी चाल आपण ओळखली पाहिजे. आपण अजूनही जुलमी ब्रिटिशांनी घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे जगत आहोत. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून (?) सुरू झालेले आणि अनेक दोष असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर (इंग्रजी) आपण आज वापरतो. परंतु आपले पूर्वज भारतीय सौर पंचांग लाखों वर्षापासून वापरत आलेले होते. जे सर्वाधिक मान्यता असलेले आणि अचूक दिनदर्शिका म्हणून प्रचलित होते, आजही आहे. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरामागे पराक्रम- इतिहास आहे, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे १ जानेवारीला ‘हँपी न्यु ईयर’ म्हणून देशभरात सर्वच क्षेत्रात जो उन्माद होतो, तो किती बिनबुडाचा, अशास्त्रीय आणि भंपक आहे, याचा कोणीच विचार करत नाही. १ जानेवारी साजरी करताना माझी कालगणना कोणती आहे? याचा सारासार विचार कोणीच विचार करत नाही.
पैसा हिंदूंचा आणि शिव्याशाप देखील हिंदूंनाच
ज्या हिंदूंच्या पैशांवर बाजारात तेजी आहे, ज्यांच्या खरेदीमुळे आपण अधिकाधिक मालामाल होतोय, त्याच हिंदू धर्माच्या संस्कृतीला-सभ्यतेला लक्ष्य करून, त्यावर जाहिराती बनवणाऱ्या ब्रॅंड्सचा सुळसुळाट झाल्याचे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक क्रियाशील ग्राहक हा हिंदूच आहे. हिंदूंचे उत्सव, संस्कृती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. तरीसुद्धा प्रत्येक वेळी भारतीय कॉर्पोरेट संस्था हिंदूंच्या उत्सवांवर, संस्कृतीवर वेळोवेळी घाला घालण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.
उदाहरण द्यायचे झाले तर डाबर इंडिया. डाबर इंडियाने आपल्या एका जाहिरातीमध्ये एक समलिंगी जोडप्याला ‘करवा चौथ’ चा सण साजरा करताना दाखवून, हिंदूंच्या सनातन परंपरांना छेद देऊनही, आम्ही आमचे उत्पादन अखेर हिंदूंनाच विकतो, हाच संदेश दिला आहे. असे केवळ डाबर इंडियानेच केले नाही तर सीएट पासून फॅब इंडियापर्यंतच्या सर्व हिंदुद्वेष्ट्या कंपन्या हेच करत आहेत आणि हे असे उद्योग करताना त्यांना काही वाटतही नाही, याचे कारण म्हणजे आपला हिंदू समाज या किंवा अशा अशाप्रकारच्या घटनांना एकमताने पुढे येऊन प्रतिकार करत नाही, किंवा त्याला प्रतिउत्तर देत नाहीत.
हिंदू संस्कृतीवर कशाप्रकारे घाला घातला जात आहे, हे पाहण्यासाठी या जाहिरातीतील बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजेत. अति उदारमतवादी धोरण राबविण्यासाठी या जाहिरातीत करवा चौथनिमित्त दोन समलैंगिक महिला हा सण साजरा करतानाचा एक प्रसंग चित्रित करण्यात आला होता. करवा चौथ हा पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो, या जाहिरातीतून पती (पुरुष) हटवण्यात आला आहे. या जाहिरातीत करवा चौथची परंपरा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली असून हिंदू सण जाहिरातीत दाखविताना त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता डाबर इंडियाला वाटली नाही का? हा प्रश्न उपस्थित राहतो.
यापूर्वी फॅब इंडियाने दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाज’ मोहीम सुरू केली, दिवाळीची खिल्ली उडवली आणि तिचे उर्दूकरण करण्याचा प्रयत्न केला. कपड्यांच्या संग्रहाच्या जाहिरातीमध्ये कंपनीने दिवाळीला जश्न-ए-रिवाज असे म्हटले होते. हिंदू धर्माला लक्ष्य बनविण्याचे काम यापूर्वी रेड लेबल, सिप्ला, तनिष्क ज्वेलर्स, आदी कंपन्यांनीही केला असून यात सीएट टायर्सचासुद्धा समावेश झाला आहे. सीएटने सुद्धा दिवाळीच्या तोंडावर हिंदूंना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. सीएट टायर्सच्या जाहिरातीमध्ये आमिर खान रस्त्यावर फटाके फोडत असलेल्या मुलांना म्हणतो, की रस्ता हा येण्या-जाण्यासाठी असतो; फटाके फोडण्यासाठी नाही. आता या म्हणण्याचा आणि टायरच्या जाहिरातीचा काहीच संबंध नाही; तरीसुद्धा हिंदू धर्माला, त्याच्या परंपरांना बदनाम करण्यासाठी मुद्दामहून असे प्रकार केले जातात.
तनिष्क ज्वेलर्सने आपल्या जाहिरातीमधील मॉडेलला मुघलकालीन कानातले घालून तसेच कपाळावर बिंदी न लावता प्रस्तुत केले आहे. मुस्लिम पद्धतीचा तिचा अवतार हिंदूंच्या सणांच्या जाहिरातींसाठी का दाखविण्यात यावा, हे न उलगडलेले कोडेच आहे.
सीएट टायर्सला जर काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी जाहिरात बनवायची होती, तर रस्त्यावर नमाज पढणे, मशिदींवर भोंगे लावून लोकांची झोपमोड करणे आणि त्यांच्या दैनंदिन कामांत अडथळा आणणे, ईदला प्राणिबळी देणे, वगैरे विषय घेऊनसुद्धा जाहिरात बनवता आली असती; पण त्यांना केवळ हिंदूंच्याच संस्कृतीवर घाला घालायचा आहे. अल्पसंख्य म्हणवल्या जाणाऱ्या मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मियांनी अशा जाहिराती खरेतर सहनच केल्या नसत्या. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील, असे काही करण्याची ते हिंमत करणार नाहीत. हिंदू बहुसंख्य असूनसुद्धा, त्यांच्या अतिसहिष्णू, अतिसज्जन स्वभावामुळे ते केवळ या जाहिराती स्वीकारतात असे नव्हे, तर या कंपन्यांची उत्पादनेसुद्धा विकत घेतात. असे करून आपण आपल्याच धर्माचे नुकसान करत आहोत, याची त्यांना जाणीव नसते. हिंदूंनी जर ठरवून बहिष्कार घातला, तर या कंपन्यांना व्यवसाय करणे अशक्य होईल, हे अगदी साध्या सांख्यिकी माहितीवरून कोणालाही समजू शकेल.
हिंदुत्व विरोधी काँग्रेस
छद्मी काँग्रेस सरकारने हिंदूंना कायमच दुय्यम वागणूक दिली आहे. हिंदूंचा उत्कर्ष कायमच काँग्रेसी इकोसिस्टीमच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे मिशनरी, जिहाद्यांच्या आडून हिंदूंना मुद्दाम डिवचण्याचा छद्मी डाव आपण ओळखला पाहिजे.. आपणासमोर कायमच ख्रिश्चन अथवा ख्रिसच्यानिटी म्हणजेच प्रेमाचा,शांतीचा, सौहार्दाचा,उन्नतीचा धर्म म्हणून आपल्यासमक्ष प्रस्तुत केला जातो पण खरंच तसे आहे का?.. नाही. परिस्थिती बरोबर याच्या उलट आहे.जिथे जिथे ख्रिस्ती मिशनर्यांनी धर्मांतरण केले तिथे तिथे त्यांनी तेथील मूळ संस्कृती समूळ नष्ट करून टाकली, मग ते ऑस्ट्रेलिया असो की लॅटिन अमेरिका असो.
फटाके वाजवावेत कि नाही, कशाप्रकारे वाजवावेत, इ.मुद्दे चर्चेचा विषय होऊ शकतात; पण इतर कोणत्याही धर्मातील रूढींविषयी भाष्य न करता, केवळ हिंदू धर्मातील रुढींवर टीका करायची, हे प्रकार काही नवे नाहीत.लेखाच्या सुरुवातीला ज्या कंपन्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनीसुद्धा अनेकदा हिंदू धर्माला लक्ष्य केले आहे. रेड लेबल या चहाच्या कंपनीने तर, तीन जाहिरातींमध्ये हिंदू माणूस कसा संकोची स्वभावाचा असतो, इतरांशी जुळवून घेत नाही वगैरे दाखवले आहे. खरे म्हणजे, हिंदू संस्कृतीच या जगातील सर्वांत उदार आणि सहिष्णू संस्कृती आहे, हे दाखवून द्यायचे झाले तर, बरीच उदाहरणे देता येतील.
हिंदू संस्कृतीमध्ये सहिष्णुता आहे. हिंदू संस्कृतीच्या चालीरीती परंपरेने चालत आल्या आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पण हिंदूंच्या याच सणांमध्ये महाशिवरात्रीमध्ये दूध वाया न घालविण्याचे सल्ले दिले जातात. होळीमध्ये पाणी वाचविण्याची आठवण केली जाते. ख्रिसमस आणि पाकिस्तानच्या विजयावेळी मोठ्या प्रमाणावर वाजणारे फटाके हा त्यांच्यासाठी उत्सव असतो, पण दिवाळीच्या वेळी याच फटाक्यांमुळे प्रदूषण होते. प्रत्येक हिंदू परंपरा आणि सण खरे तर हिंदुद्वेष्ट्यांसाठी एक बाधा आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
ईदच्या वेळी कधी बिग बिलयन सेल वगैरे लागलेले आपल्या ऐकिवात नाही. पण दिवाळीत काही तासांतच फ्लिपकार्ट सहा कोटींच्या सामानाची विक्री करतो. खरे सांगायचे तर हिंदूंना आपली ताकद ओळखता आलेली नाही. आपली ताकद ओळखण्यासाठी जरा उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल कि, भारतात सणासुदीचा काळ सुरु होताच आर्थिक मरगळ दूर झाली. सप्टेंबर महिन्याचे बाजारपेठेत उसळी मारणारे आकडे जगाला अचंबित करणारे आहेत. हे आकडे ख्रिसमस किंवा रमझानमुळे वाढलेले नाहीत. एका अनुमानानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी प्राप्त होणार आहे. इलेक्ट्रॉनिक बाजार तेजीत आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.
हिंदू कुटुंबियांची ताकद ही त्यांच्या बचतीची ताकद आहे. यापेक्षाही त्याची मोठी ताकद ही त्याची क्रयशक्ती आहे. यामुळे खरेदीची त्यांची क्षमता अग्रस्थानी असते आणि सण-उत्सवांमध्ये सुद्धा सर्वाधिक हिंदूंच्या कमाईचा पैसा दिवाळीत बाजारात जातो. मग? याच बाजाराला हिंदू सण, प्रतीके, आस्थाचिन्हे, परंपरांचा सन्मान करायला नको का? डाबर, सीएट, फॅब इंडिया, सर्फ एक्सेल सारख्या अनेक ब्रँड्स आमच्या धर्म, परंपरा, रीति-रिवाज, सणांची खिल्ली उडवून आम्हालाच त्यांचे सामान विकतात. हिंदूंच्या पैशांवर धनदांडग्या झालेल्यानी हिंदू धर्माच्या खरेदीची ताकद ओळखायला हवी. त्यांना जर त्यांचे सामान विकायचे असेल, तर आमच्या परंपरांचा, संस्कृतीचा, उत्सवांचा सन्मान त्यांना करायलाच हवा.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, युधिष्ठिराला जसे सर्व मनुष्यांमधे फक्त सद्गुणच भरलेले दिसत, तसेच, हिंदू समाजालासुद्धा आपल्या हितशत्रूंमध्ये काही वाईट दिसत नाही. या अशा जाहिराती हिंदू माणसाला सर्वधर्मसमभावाचे प्रतीक वाटतात. वस्तुतः, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांमध्ये अनेक कुरीती आहेत आणि नवीन कुरीती तयार होत आहेत; पण त्यावर मात्र कोणी जाहिराती बनवत नाहीत. कोणी जर हे प्रश्न उठवू लागला, तर स्वतःला पुरोगामी किंवा सेक्युलर म्हणवणारे लोक त्याला ‘कट्टर’, ‘असहिष्णू’ अशी नावे ठेवतात.
चर्च तसेच चर्चप्रणित अनेक संस्था, डावी मंडळी, डीप स्टेट असा वर्ग उदयाला आला आहे. हा वर्ग काँग्रेससारखे सनातन संस्कृतीला आणि भारतीयत्वाला विरोध करणारे तथाकथित सेक्युलर पक्ष, शहरी नक्षल आणि यांना साथ देणारे विकाऊ पत्रकार आणि चॅनल्स यांच्या पुढाकाराने आदिवासी (मूलनिवासी) दिवस कार्यक्रम आणि त्यामागील मनोभूमिका तयार करण्याचे आणि वनवासी समाजाला तोडण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. तुम्हा आम्हाला याचे वास्तव माहिती नसते आणि समजून घ्यायची इच्छाही नसते आणि त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे.त्यामुळे आपण अखंड सावधान असणे अत्यंत आवश्यक आहे.
समर्थ म्हणतात
सावध चित्ते शोधावे, शोधोनी अचूक वेचावे
वेचोनी उपयोगावे, ज्ञान काही I
अखंड सावधान असावे,दुश्चित कदापी नसावे
तजविजा करीत बैसावे, येकान्त स्थळी I I
Introductory Memo