अनंतनागमध्ये मिळाला हिंदू धर्माचा धार्मिक आणि ऐतिहासिक ठेवा !
जम्मू-काश्मीर, विशेषतः अनंतनाग जिल्हा, हे प्राचीन काळापासून हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. तेथे सापडलेल्या शिवलिंगांमुळे या प्रदेशातील समृद्ध हिंदू इतिहासावर नव्याने प्रकाश पडला. या प्रदेशाला लाभलेल्या कर्तुत्ववान राज्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची देखील या निमित्ताने पुनरावृत्ती होईल. अनंतनाग जिल्ह्यात उत्खननादरम्यान नुकत्याच सापडलेल्या विविध देवी देवतांच्या प्राचीन मूर्ती आणि ११ शिवलिंगे हे अलौकिक हिंदू वारशाचे प्रतीक आहे.