पंढरपूर कॉरिडॉर: हिंदू संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे आणि भक्तीचे नवे दालन
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या पंढरीचा कायापालट करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकताच ४,१५०.४६ कोटी रुपयांच्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला मान्यता देऊन विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. वाराणसीच्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तब्बल १८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कॉरिडॉरच्या पूर्णत्वासाठी ३० महिन्यांची कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. हा प्रकल्प हे पंढरपूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले एक ऐतिहा